Description
आयुर्वेदिक सुगंधी उटणे (Utane)
Contains: [In Powder form] Chandan, Wala, Vekhand, Nagarmotha, Kachora, Gulab, Santra, Bavchi.
दिवाळी जवळ आली की आपल्याला आठवण होते कडाक्याच्या थंडीत पहाटे तेल लावणे आणि मग उटणे लावून केलेली आंघोळ. अभ्यंगस्नानाला आपल्याकडे पूर्वीपासून महत्त्व आहे. अभ्यंगाचे आयुर्वेदात असंख्य वर्षांपूर्वी महत्त्व सांगितले आहे. विविध नैसर्गिक घटकांपासून तयार झालेले हे एक प्रकारचे सुगंधी स्क्रबर असल्याचेच म्हणावे लागेल. हे उटणे केवळ थंडीतच नाही तर एरवीही वापरायला हवे ज्यामुळे चेहऱ्याची त्वचा चांगली होण्यास मदत होते.
उटणे हा चंदन, वाळा, वेखंड, नागरमोथा, कपुर कचोरी, अनंतमूळ, गुलाब, संत्रा, बावची, इत्यादी सुगंधी व औषधी वनस्पती वापरून उटणे तयार करतात. हे घटक त्वचेला स्क्रबर म्हणून काम करतात. यामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते. चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो. यास दुधात घट्ट भिजवून मग अंगास लावतात. हा लेप मग वाळण्यापूर्वी रगडून काढतात. चेहर्यास लावलेला लेप रगडून न काढता हलके हाताने काढतात.
हळद असलेले उटणे लग्नापूर्वी वधूच्या अंगाला लावतात. दिवाळीतल्या उटण्यात हळद नसते.
पूर्वी उटणे घरीच तयार करीत असत. आजकाल ही पध्दत मागे पडली आहे. म्हणूनच आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत, कोल्हापूरच्या प्रसिद्ध बावडेकर आयुर्वेद यांचे पारंपरिक, आयुर्वेदिक, सुगंधी उटणे.
For wholesale purchase, kindly contact – 8087305611/ 7219722255
Reviews
There are no reviews yet.