Gudi Padwa Set (गुढीपाडवा सेट)
1 set contains:
नागकेशर, तांब्याचा तुकडा, पादुका प्रतिमा, हळकुंड, सुपारी, हिरडा
₹60
Gudi Padwa Set (गुढीपाडवा सेट)
1 set contains:
नागकेशर, तांब्याचा तुकडा, पादुका प्रतिमा, हळकुंड, सुपारी, हिरडा
1 set contains: नागकेशर, तांब्याचा पादुका प्रतिमा, हळकुंड, सुपारी, हिरडा
गुढीपाडव्याला काय कराल?
वाचक बंधू-भगिनींना नमस्कार…
आपण दर आठवड्यास, सतत भेटत असतो. उपयुक्त तोडगे-उपासना बाबतीत माहिती घेत आलो आहे. आपल्या काही वाचकांनी गुढी पाडव्याविषयी विशेष तोडगा मागितला आहे. तर यावेळी आपण गुढी पाडव्याच्या तौडग्याविषयी माहिती करुन घेणार आहोत. हा तोडगा फक्त हिंदू धर्मातील गुढीपाडव्यासच सिद्ध होतो. या तोडग्याचा प्रभाव फारच प्रभावी आहे. घरात सुख-शांती नांदून. घरात अग्नी पासून बचाव होतो. दिसण्यस साधा व सोपा असला तरी या तोडग्याची प्रचिती मी व माझ्या अनेक कुटुंबियांनी घेतली आहे. या इथे हा तोडगा तुमच्या व तुमच्या माहितीतील कुटुंबियांना सांगून सुखी करावे. आपण इतरांच्या कुटुंबात सुख पेरावे, परमेश्वर आपल्या संसारात नक्कीच सुख-शांती देतो.
तर वाचक हो । गुढीपाडव्याच्या अथवा शुभ दिवशी, आदल्या दिवशी खालील वस्तू प्राप्त कराव्यात. एक सफेद कापड, एक पिवळे कापड, नारळ, मूठभर नागकेशर, तांब्याचा तुकडा, पादुका किंवा पादुका प्रतिमा, हळकुंड, सुपारी, मूठभर अक्षता (तांदूळ) अक्षता म्हणजे शक्यतो न तुटलेले तांदूळ, गुढी पाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाबरोबर आंघोळ करावी, आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात एक चिमूटभर घरची हळद टाकावी. हळद टाकताना आपल्या कुलदैवतेचे नांव जरूर घ्यावे. आंघोळ चालू असताना ‘ॐ नमो विष्णवे नम:’ मंत्रजप चालू ठेवावा, आंघोळ झाल्यावर बाथरूम/ न्हाणीघरातून पूर्वेस तोंड करुन सूर्यास अर्घ्यघावे. अर्घ्यदेताना ‘ॐ ऱ्हीम् सूर्याय नमः’ हा मंत्र जरूर म्हणावा. अंगावर गरजेपुरते कपडे घालावेत. तोंडाने ‘ॐ नमों विष्णवे नम:’ हा मंत्र जपत रहावा. घरभर गोमुत्र शिंपडावे. नंतर जो सफेद कपडा आहे त्याला हळदीने पिवळा करावा. त्या कपड्यात वरील सर्व पदार्थ ठेवावेत.
प्रथम तांदूळ (अक्षता), नागकेशर, नारळ ठेवून इतर वस्तू ठेवाव्यात. तोंडाने सतत ‘ॐ विष्णवे नम:’ हा मंत्र जपत रहावा, नंतर या सर्व वस्तूंची पुरचुंडी बांधावी. ही पुरचुंडी पिवळ्या कपड्यात बांधून ही नवीन पुरचुंडी आपल्या स्वयंपाकघरात बांधावी. ही यशदायी पुरचुंडी आपल्या घरात सुख-शांती देईल, हा सर्व विधी गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी १२ च्या आत करावा, जेवढ्या लवकर करता येईल तेवढे चांगले. रोज न चुकता घरातील अन्नाचा नैवेद्य खालूनंद दाखवावा, ही पुरचुंडी शक्यतो स्वयंपाक घरातील छतावर, सिलींगवर अडकवावी अथवा बांधावी. दर गुरुवारी व शुभ दिवशी खालूनच धूप- अगरबत्तीचा धूर द्यावा. पुढील गुढीपाडव्यास नवीन पुरचुंडी बांधून, जुनी वाहत्या पाण्यात सोडून द्यावी. आज कित्येक वर्षे या तोडग्याचा उपयोग अनेक घरातून न चुकता दर गुढीपाडव्यास केला जातो. ज्यांना शक्य असेल त्यांनी जमिनीस स्पर्श न झालेला नारळ घ्यावा. वरील प्रयोगात उपयोग करावा. तोडगा जास्त प्रभावी होतो. यात हळदीचा उपयोग फारच महत्त्वाचा आहे. केवळ आपल्याच धर्मात नसून सर्व धर्मात शुभ कार्यास हळद उपयोगात आणली जाते. तर नागकेशर लक्ष्मीकारक आहे. केशर नाही, मसाल्यात वापरतो तो नागकेशर,
अक्षता तर सर्वांनाच माहित आहेत. या इथे पादुका अथवा पादुका प्रतिका लहरी ग्रहण करतात. जर पादुका/पादुका प्रतिमा तांब्याच्या असतील तर उत्तम, नाही तर चांदीच्या अथवा पत्र्याच्या चालतील. सोनाराकडे या पादुका मिळतील. आंघोळीच्या वेळी हळद पाण्यात टाकावी. यामुळे आंधळीस पावित्र्य मिळून वेगळाच आनंद प्राप्त होतो. तर वाचक हो । आंघोळीच्या पाण्यात घाई-घाईत इळद टाकण्यास विसरू नये, है मुद्दाम नमूद करीत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आंघोळीनंतरचे कपडे नवीन असावेत. जमत नसेल तर स्वच्छ धुतलेले तरी असावेत. तर, वाचकांनी हा प्रयोग स्वतः करावा व इतरांना सुद्धा सुचवून पुण्य पदरात बांधावे…
-अ. सांडगे
(ज्योतिष सल्लागार, वास्तु गुण-दोष जाणकार)
Weight | 0.1 kg |
---|---|
Quantity | 1 set |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.